logo

निरंकारी मिशन मार्फत ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन‘ परियोजनेचा दूसरा टप्पा रविवारी

निरंकारी मिशन मार्फत ‘प्रोजेक्ट अमृत’*अंतर्गत*
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन‘ परियोजनेचा दूसरा टप्पा रविवारी

"सांगली जिल्ह्यातही जलसाठ्याची स्वच्छता"
         
दिल्ली, 20 फेब्रुवारी, 2024:- प्रोजेक्ट अमृत अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन रविवार, दिनांक 25 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 08:00 वाजता सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना छठ घाट, आई. टी. ओ. दिल्ली येथून केला जात आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समाज कल्याण विभागाचे प्रभारी श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी या विषयी माहिती देताना सांगितले, की ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत ही परियोजना अवघ्या भारतवर्षात जवळपास 1500 पेक्षा अधिक ठिकाणी 27 राज्यें व केंद्र शासित प्रदेशांतील 900 शहरांमध्ये एकाच वेळी राबविली जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पांबाबत जनसामान्यांना जागृत करुन येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य स्वस्थ करणे हा आहे.
बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीचे अनुसरण करत संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ वर्ष 2023 मध्ये केला आहे. या परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण, त्यांची स्वच्छता व जनसामान्यांमध्ये याविषयी ‘जागरूकता अभियान’ राबवून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे. या परियोजने अंतर्गत संपूर्ण भारतातील विविध ठिकाणचे समुद्र किनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी, झरे इत्यारी जलसाठ्यांची स्वच्छता करण्यावर ध्यान केंद्रीत करण्यात आले असून त्या ठिकाणांची स्वच्छताही करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणाच्या हेतुने राबविल्या जाणाऱ्या या परियोजनेची समाजातील सर्व स्तरातून स्तुती करण्यात आली असून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झालेला आहे.
दिल्लीमध्ये या अभियानाला ‘आओ सवारें, यमुना किनारे’ (चला सावरु, यमुनेचे तिर) असा नारा देऊन ते सर्वत्र पसरविले जात आहे. त्यामध्ये निरंकारी मिशनचा युवावर्ग दिल्ली, इंद्रप्रस्थ व जे.एन.यू.विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयीन संस्थांमध्ये जाऊन जल रक्षणावर आधारित गीतांचे सादरीकरण, जलजन्य रोगांच्या प्रति जागृती निर्माण करणारी समूह गीतं, सेमिनार तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जनमानसाला जागृत व प्रोत्साहित करत आहेत.

‘अमृत परियोजने’ अंतर्गत सांगली, खानापुर व वाळवा सेक्टर अंतर्गत सांगली,मिरज,देशिंग,नरवाड,सलगरे,जत, कवठेमहांकाळ तसेच खानापुर सेक्टर अंतर्गत खानापुर, आटपाडी,तासगाव,बिरणवाडी
कडेगाव,विटा,नेवरी,सावळज तसेच वाळवा सेक्टर अंतर्गत वाळवा,शिराळा,पलुस,इस्लापुर, भाटवडे,इत्यादी ठिकाणांची स्वच्छता समस्त स्वयंसेवकांकडून मोठ्या उत्साहाने केली जाणार आहे.

संत निरंकारी मिशन सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांमध्ये निरंतर आपली सक्रिय भूमिका बजावत वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, तलासरी बांध परियोजना, वननेस वन, पर्यावरणीय मुद्यांबाबत जागरूकता यांसारख्या योजनांना कार्यान्वित करुन संचलित करत आहे. नि:संदेह मिशनच्या अशा कल्याणकारी योजना पर्यावरण संरक्षण व धरतीला सुंदर बनविण्यासाठी एक प्रशंसनीय व स्तुत्य पाऊल आहे ज्यावर अंमलबजावणी करुन धरतीला अधिक स्वच्छ, निर्मळ व सुंदर बनविले जाऊ शकते.  
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने बाबा गुरबचनसिंह मेमोरियल 24व्या क्रिकेट टुर्नामेंटचा प्रारंभ संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे रविवार, दिनांक 25 फेब्रुवारीला करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशातील अनेक राज्यांतील खेळाडू भाग घेणार असून अनुशासन, मर्यादा व सहनशीलतेचा सुंदर परिचय देत एकत्वाचा दिव्य संदेश देऊन युवावर्गाचे प्रेरणास्रोत होणार आहेत.
---------------------------------------------------

13
2661 views